जुन्नर : गेल्या सात आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने बुधवारपासून रौद्र रूप धारण केल्याने पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातल्या अनेक गावांमध्ये ओढ्यानाल्यांना पूर आले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे डोंगर द-यातून अनेक ठिकाणी छोटे-मोठे प्रवाह वेगाने वहात आहेत.
जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. संततधार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये भातखाचरांमध्ये पाणी साठलेले आहे. भात खाचरांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे आदिवासी भागातील भात लावणीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात काही शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्यास भात लावणीच्या कामाला वेग येईल. त्यामुळे आता बळीराजाला पाऊस थांबवण्याची प्रतिक्षा आहे.
अनेक गावातील बत्ती गुल
दरम्यान, या परिसरात अनेक दिवस चालू असलेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये काही दिवस विज खंडीत झाली असून काही ठिकाणी मोबाईल सेवाही अधुनमधून खंडीत होत होती. संपर्काचे माध्यम झालेले मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दुसऱ्या गावाला मोबाईल चार्जिंग करावे लागत आहेत.
हेही वाचा :
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती
राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे
आजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या शहरातील दर !
राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार
सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार
राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’
‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय