Friday, May 3, 2024
Homeराज्यराज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली

राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी गेला असून १८१ जनावरं दगावली असल्याची माहिती समोर येत आहे.

आठवडाभर चाललेल्या जोरदार पावसाचा जोर आज काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. या पावसात आतापर्यंत ९९ जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे तर १८१ जनावरं आतापर्यंत दगावली आहेत. आजवर ७ हजार ९६३ नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. या पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलनाच्या देखील घडना समोर येत आहे.

राज्यातील जोरदार मुसळधार ते अतिमुसळधार पावसानंतर आज राज्यात कुठेही रेड अलर्ट नाही. मात्र, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे विविध जिल्ह्यात 14 एनडीआरएफ आणि 6 एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

आजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या शहरातील दर !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय