Friday, April 19, 2024
Homeराजकारणकेंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवत असल्याने ‘ही’ मोठी किंमत मोजावी लागली...

केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवत असल्याने ‘ही’ मोठी किंमत मोजावी लागली शरद पवार यांचा आरोप

नागपूर : केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असून आम्ही केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात सातत्याने आवाज उठवत असल्याने अनिल देशमुख आणि नवाब मलिक या आमच्या दोन सहकाऱ्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

आज एका सर्क्युलरद्वारे खासदारांना संसदेच्या आवारात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यास बंधन घालण्यात आले आहे. सरकारने लक्ष दिले नाही तर खासदार सभात्याग करुन, बाहेर जाऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करतात. हा खासदारांचा लोकशाहीतील अधिकार आहे. तो याद्वारे हिरावण्यात आल्याचे पवार म्हणाले. तसेच, आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांनी सत्ता केंद्रीत करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

लोकशाही टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घालून दिला आहे. हा आदर्श टिकवण्यासाठी आपल्याला एका जबरदस्त संघटनेची आवश्यकता आहे आणि ती संघटना राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे म्हणत मागच्या वेळी आपण इथे कमी जागा लढविल्या होत्या, यावेळी अधिक जागा लढविण्यासंबंधी स्थानिक नेत्यांनी बसून चर्चा करावी. तुमचा जो निर्णय असेल त्याला पक्ष पाठिंबा देईल, अशी हमी देत पक्षाचा पाया मजबूत करायचा असेल तर विधानसभा निवडणुकीला इथे सामोरे जावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे रिक्त जागांसाठी भरती, प्रकृतीने सुदृढ आहात तर लगेच अर्ज करा !

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे 58 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय