Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची खा.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची खा.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की गेल्या आठवडाभरापासून जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसामुळे भूस्सखल होऊन तसेच वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे भातशेती करणाऱ्या आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातखाचरातील बांध फुटल्याने माती वाहून गेल्याने दुबार पेरणी करण्यासाठी जमीनच शिल्लक राहिली नाही. तसेच भात लावणी केलेली रोपे कुजू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची गरज आहे.

तसेच भातखाचरातील बांध दुरुस्ती व जमीन पिका योग्य करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक मदत मिळण्याची आवश्यकता आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच भातखाचरातील वाहून गेलेले बांध दुरुस्ती व पिकायोग्य जमीन तयार करण्यासाठी तांत्रिक मदत देण्याचे निर्देश कृषी विभागाला द्यावेत, अशीही मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय