तांदुळवाडी ( रत्नदीप सरोदे ) : बारामती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पुर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा बारामती तालुका व धम्मज्योती बुद्ध विहार प्रबुद्ध नगर तांदुळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन १५ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आले. यासाठी तांदुळवाडी तसेच बारामतीतील ग्रामीण भागातील उपासक व श्रामणेर इच्छुक मोठ्या प्रमाणात धम्म ज्योती बुद्ध विहारात दाखल झाले होते.Buddha

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांचे स्वागत धम्म ज्योती बुद्ध विहार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिबिरार्थींचे मुंडन करण्यात आले त्यांना चिवरदान करण्यात आले. बुद्ध परंपरेनुसार त्यांना भन्तेजींचे नामकरण करण्यात आले . त्यानंतर पूज्य भंतेजींनी धम्मदेसना दिली. सामुदायिक त्रिसरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. तसेच अल्पोपहाराचे वाटप देखील करण्यात आले. शिबिरार्थ्यांना बुद्ध वंदना पुस्तके तसेच स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. Buddha

आदरणीय पुज्य भन्ते धम्मानंद, पुणे जिल्हा पुर्व अध्यक्ष अरुण सोनवणे, पुणे जिल्हा पुर्व संस्कार उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड व पर्यटन उपाध्यक्ष वामन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुण्यशील लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर दि. १५ मे ते २४ या कालावधीमध्ये होणार आहे. यावेळी बोलताना गुरुदेव सरोदे म्हणाले श्रामनेर शिबिर घेण्याचा मान तांदुळवाडी या गावाला मिळाल्यामुळे आम्ही सर्व धम्म बांधव हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अँड किशोर मोरे (सरचिटणीस बारामती तालुका) यांनी केले.Buddha

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मज्योती बुद्ध विहार चे सदस्य अँड योगेश सरोदे यांनी केले. ते म्हणाले “श्रामनेर शिबिर हे बौद्ध युवकांमध्ये चेतना जागृत करणारे आहे. रूढी, परंपरा आणि कर्मकांड यांना फाटा देऊन, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्म सेवक बनण्याचे प्रशिक्षण या शिबिरात सर्वांना मिळेल. हे ग्रहण करत असताना आपल्या गुरूंना धम्माविषयी प्रश्न विचारा. जास्तीत जास्त बुद्ध धम्म समजून शिकून घ्या, अशा माझ्यातर्फे शुभेच्छा”.Buddha


या शिबिरात एकुण ३३ शिबिरार्थी सहभागी झाले आहेत आहेत. या कार्यक्रमास एकनाथ सरोदे, अनिल सरोदे , विजय कांबळे, साहिल सरोदे, ऋषिकेश सरोदे, रोहन शिंदे, ऋषिकेश भोसले, ॲड. रणजित उबाळे, ॲड संदीप बनसोडे, सचिन चव्हाण ,विकास सोनवणे, डॉ सुधीर साळवे, संदीप पानसरे सह धम्मज्योती बुद्ध विहार प्रबुद्ध नगर परिसरातील धम्म बांधव तसेच बारामती तालुका सर्व पदाधिकारी व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.Organization of ten days Shramner camp in Tandulwadi

