Friday, November 22, 2024
Homeग्रामीणजुन्नर : अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान...

जुन्नर : अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – किसान सभेची मागणी

जुन्नर : अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नायब तहसीलदार शांताराम किर्वे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, तालुका सचिव लक्ष्मण जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे, संजय साबळे, आंबे – पिंपरवाडीचे सरपंच मुकुंद घोडे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवडाभरात जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात शेतजमीन व भात, नाचणी सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या आहेत. नाचणी व भाताची रोपे अनेक दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे सडलेली आहेत. काही भागात भूस्खलन झाल्याने रोपे मातीखाली गाडली गेली आहेत. यामुळे जमिनीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

तसेच तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन, टोमॅटो यांसह इतर भाजीपाला बागायती पिकांची मोठी हानी झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी तालुका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतजमिनी आणि पिकांची पाहणी करून ताबडतोब पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. ज्या शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे नुकसान झालेले आहे. त्यांना रोजगार हमी, पडकई यासारख्या योजनांतून बांधबंदिस्ती करून मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर नारायण वायाळ, पोपट ढेंगळे, सुदाम सरोगदे, सचिन मोरे, कोंडीभाऊ बांबळे, गोविंद निर्मळ, पोपट दिघे, दिपक डामसे, संदीप शेळकंदे, मनिषाताई कोकणे, शंकर माळी, अशोक दिवटे, जितेंद्र डामसे, विलास डावखर, अनिल बेंगळे, मंगलताई रढे, काशिनाथ बुळे, देवराम आसवले, गणेश मराडे आदींचे नावे आहेत.

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

आजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या शहरातील दर !

संबंधित लेख

लोकप्रिय