Sunday, May 5, 2024
Homeजुन्नरJunnar : बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी

Junnar : बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी

Junnar: पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ती जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. (Junnar)

सविस्तर वृत्त असे की, पिंपळवाडी येथील तोतर बेट मळ्यात रहात असलेले सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या शेतात मंगळवारी ऊस तोडणी चालू होती. त्यावेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ऊसतोडणी कामगारांसोबत असलेल्या रितू श्‍यामराव गागुर्डे (वय १८ मुळ रा. चाळीसगाव) या मुलीवर बिबट्याने अचानकपणे हल्ला केला. त्यावेळी बाजूला असलेल्या ऊस तोडणी कामगारांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला.

दरम्यान, यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्यांनी रितु गांगुर्डे हिच्या डोक्यावर, खांद्यावर व पाठीवर जखमा झाल्या. यानंतर तातडीने रितु हिस उपचारासाठी पिंपरीपेंढार येथील सरकारी दवाखान्यात नेत वनविभागास ऊसतोड मजुरांनी माहिती दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे वनसेवक बी के खर्गे, रोशन नवले तातडीने घटनास्थळी पाठवले. या ठिकाणची ऊस तोडणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय