Monday, May 6, 2024
Homeजिल्हाNandurbar: बिरसा फायटर्सचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

Nandurbar: बिरसा फायटर्सचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

Nandurbar: नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली गोपाल भंडारी यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता नवापूर चौफूली ते जिल्हाधिकारी नंदुरबार पर्यंत तुफान बाईक रॅली काढण्यात आली. तसेच शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. (Nandurbar)

यावेळी बिरसा फायटर्स संघटनेकडून गोपाल भंडारी यांचाही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला. काही तांत्रिक कारणांमुळे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. सुशिलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी दाखल करण्यात येणार आहे.

रॅलीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, राज्य सचिव संजय दळवी, कोकण विभाग प्रमुख राजाभाऊ सरनोबत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, जिल्हा संघटक हिरामण खर्डे आदि हजारों बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते. (Nandurbar)

सुशिलदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतो येणार नाय, आल्याशिवाय राहणार नाय, कोण म्हणतो निवडणार नाय, निवडल्याशिवाय राहणार नाय, आवाज कुणाचा, बिरसा फायटर्सचा,लढेंगे और जितेंगे, अपक्ष उमेदवारही जितेंगे! अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

रॅलीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बिरसा फायटर्स संघटनेची रॅलीत स्वईच्छेने व स्वखर्चाने नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातील बांधव उपस्थित होते. बिरसा फायटर्सची तुफान बाईक रॅली दणक्यात झाली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय