Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar: भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

Junnar: भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

Junnar: चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे उभ्या असलेल्या ट्रेलरच्या केबिनचा दरवाजा लावत असताना कंटेनर धडकल्याने ट्रेलर चालक जागीच ठार झाला आहे. सदरील घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद टोलनाका कर्मचारी गणेश गावडे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात मंगळवारी उशिरा दिली. (Junnar)

सविस्तर वृत्त असे की, पुण्याहून नाशिककडे जात असलेला ट्रेलर (क्र.एमएच १५ सीके २४९६) चाळकवाडी येथे असलेल्या टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला थांबला.

त्यावेळी ट्रेलर चालक आशिष सुखलाल पटेल (रा. गंभीरा, कटरा, ता. जठवरा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा खाली उतरून दरवाजा लावत असताना पाठीमागून आलेला कंटेनर (क्र. आरजे १४ जीपी ३०७७) ट्रेलरच्या केबिनला घासला. त्यात ट्रेलर चालक आशिष पटेल याच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन तो जागीच ठार झाला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय