मुंबई : शिंदे फडणवीस सरकारने आज झालेल्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अल्पमतात असताना २९ जून २०२२ रोजी शेवटच्या दिवशी कॅबिनेट बैठक बोलवली. त्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज पुन्हा या नामकरणाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली
राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती
जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे रिक्त जागांसाठी भरती, प्रकृतीने सुदृढ आहात तर लगेच अर्ज करा !
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे 58 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !