Gold Rate : मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या, मात्र आता ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली असून, ग्राहकांमध्ये सोनं खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
गेल्या दोन महिन्यांत सोन्याचे दर वाढून 80 हजारांवर गेले होते. पण आता, गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 71,000 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 77,440 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम 7,085 रुपयांना तर 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम 7,729 रुपयांना मिळत आहे. या आठवड्यात सोनं प्रति 10 ग्रॅम 1,350 रुपयांनी कमी झालं आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये सोनं खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसमारंभ वाढतात, त्यामुळं सराफा बाजारात ग्राहकांची गर्दीही वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदीवर कुठलाही कर लागू नसल्याने दरात तफावत असते. भारतात सराफा बाजारात मात्र शुल्क आणि कर यांचा समावेश होतो, त्यामुळे दर थोडेसे जास्त असतात. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क वापरला जातो, ज्यात 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे क्रमांक दिलेले असतात.
ग्राहकांसाठी सोन्याच्या या घसरलेल्या किमतींमुळे खरेदीची ही एक उत्तम संधी ठरू शकते.
Gold Rate
हेही वाचा :
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य