Sunday, December 8, 2024
Homeराजकारणसुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

Supriya Sule : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर इशारा दिला आहे. फडणवीस यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांना फाईल दाखवली होती,अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजितदादा स्वतः भाषणात म्हणाले. यावर आक्षेप घेत सुळे म्हणाल्या, “निवडणूक संपण्याची वाट बघतेय, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार आहे.”

सुळे यांच्या मते, “मुख्यमंत्री असताना गोपनीय फाईल्स कोणालाही दाखवण्याचा अधिकार नसतो. फडणवीस यांनी अजित पवारांना फाईल दाखवली कशी आणि का दाखवली, याचे उत्तर राज्याला द्यावे लागेल.” सुळे यांनी यास संविधानाचा अपमान म्हणत फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

सुळे पुढे म्हणाल्या, “ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घरी बोलवून फाईल दाखवणे योग्य आहे का? राज्याचे मुख्यमंत्री असताना फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही.” यापूर्वीही त्यांनी फडणवीस यांना फाईल प्रकरणी इशारा दिला होता, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांचेही नाव गोवले गेल्याचे त्यांनी नमूद केले.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीनंतर या प्रकरणात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Sule

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय