Pune: विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात राजकीय वातावरण तापले असून शिरूर मतदारसंघात एक गंभीर घटना घडली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे, ऋषिकेश पवार याचे अपहरण करण्यात आले असून, त्याला विवस्त्र करून त्याचा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
असीम सरोदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती देण्यात आली. ऋषिकेश पवार आपल्या वडिलांच्या प्रचारात व्यस्त असताना एका सहकाऱ्याने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ऋषिकेश त्या भेटीसाठी तयार झाला. मात्र, मांडवगण फाट्याजवळील एका गावात पोचल्यानंतर त्याला जबरदस्तीने एका खोलीत कोंडण्यात आले. त्याच्या अंगावरील कपडे काढून एका महिलेसह त्याचा अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आला. विरोध केल्यानंतर त्याला जीव मारण्याची धमकी देण्यात आली.
हा सगळा प्रकार करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? असे ऋषिराजने विचारले त्यावेळी त्या लोकांनी सांगितले की, यासाठी पुण्यातील एका व्यक्तीने आम्हाला दहा कोटी रुपये देण्याची तयारी केली आहे. त्यानंतर ऋषिराजने लोकांना मी तुम्हाला भरपूर पैसे देईल असे सांगितले. आणि जवळच्याच गावात माझा मित्र राहतो. त्याच्याकडे जाऊन पैसे घेऊ असे सांगितले. त्या गावात गेल्यानंतर आरोपीची नजर चुकवून ऋषिकेशने प्रसंगावधान राखून आरोपींच्या नजरचुकीचा फायदा घेत आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात आरोपी कोलपे आणि अन्य दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून, त्या महिलेला अटक करण्यात आले आहेत.त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेवर अशोक पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझ्या मुलाबरोबर झालेला हा प्रकार संतापजनक आहे. निवडणूक लोकशाही मार्गाने लढावी. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य आरोपीला अटक करावी,” असे आवाहन पवार यांनी केले.
Pune
हेही वाचा :
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
राज्यात थंडीचा जोर वाढणार ; हवामान विभागाने दिला इशारा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर
चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा