Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदी-देहू परिसर विकास समिती तर्फे आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन

Alandi : आळंदी-देहू परिसर विकास समिती तर्फे आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन

२२ नोव्हेंबर ते गुरुवार, दि.२८ नोव्हेंबर २०२४ (Alandi)

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या तर्फे २२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्या निमित्त जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी यात्रे निमित्त होत असलेल्या या सप्ताहात श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे भजन, कीर्तन, प्रवचन यासह लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. (Alandi)

या सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. २२ ) रोजी सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहे. या सोहळ्याला जगप्रसिध्द संगणकतज्ञ, प्रमुख मार्गदर्शक व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कुर्‍हेकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, आळंदी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ रा. देखणे, देहू येथील श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर, श्री विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, मावळ, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद आदी उपस्थित राहणार आहेत. (Alandi)

विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मिती साठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आळंदीत आहे.

या सोहळ्यात सकाळी ९.३० ते १२. ३० वाजेपर्यंत ह.भ.प. श्री. उध्दव महाराज पाटील रमजानपूरकर, ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज बोधले, शिवशंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प.श्री धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर-पिंपरीकर व अच्युत महाराज दस्तापूरकर यांची कीर्तने होणार आहेत. तसेच मान्यवरांच्या हस्ते हरिपाठ व इंद्रायणी मातेची आरती होईल.

या सोहळ्या निमित्ताने दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत व्याख्याने व प्रवचन होतील. यामध्ये सुफी संत व इस्लाम धर्माचे अभ्यासक लतिफ पटेल, नासिक येथील भागवताचार्य स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. रविदास महाराज शिरसाठ, संत बुवासाहेब ठाकुर बुवा दैठणा या फडकरी परंपरेतील सहावे वंशज हभप डॉ . तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर, राजस्थान बासवाडा येथील श्री श्री १००८ महामंडलेश्वर अनंत विभूषित ध्यानयोगी महर्षि उत्तम स्वामी जी महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप बापूसाहेब मारे देहूकर यांचे प्रवचन होतील.

दररोज संध्याकाळी ७.१५ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प अर्जुन महाराज लाड गुरूजी, भागवताचार्य बालयोग ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर, रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसनमहाराज साखरे व वै.बाबामहाराज सातारकर यांचे नातू ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.

रात्रीच्या ९.१५ ते ११.३० च्या सत्रात विश्वशांती संगीत कला अकादमी, राजबाग, पुणे येथील शिक्षक व विद्यार्थी यांचा विश्वशांती दर्शन हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या शिष्या श्रृती पाटील यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राधाकृष्ण गरड गुरूजी व सहकारी यांचा सांप्रदायिक अभंग गवळणीचा कार्यक्रम, रुपक कलासदन च्या संस्थापक मानसी वझे प्रस्तुत अभंग वेध, हा परंपरेतील नवतेचा एक नृत्यात्मक शोध असेल. तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. आशिष रानडे, नासिक यांचा संतवाणी हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याच्या निमित्ताने गुरूवारी ( दि.२८ ) रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन, घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे. अशी माहिती श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे समन्वयक डॉ. सुनील कराड, प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली. (Alandi)

पुरातन रथाची आळंदीत चाचणी उत्साहात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सिसम लाकडापासून तयार करून घेतलेला रथ या वर्षी श्रींचे रथोत्सवात गोपाळपूर येथून ग्राम प्रदक्षिणा करण्यास वापरण्यात येणार आहे. या पुरातन वैभवी रथाची देखभाल दुरुस्ती अंतर्गत चाचणी घेण्यात आली. तसेच नगरप्रदक्षिणा मार्गावरील विद्युत केबल्स चे अडथळे दूर करण्याचे कार्य सुरू आहे. यासाठी कार्तिकी यात्रेतील यंत्रणा कार्यरत आहे. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश महाराज बागडे, अरुण बडगुजर, कनिष्ठ अभियंता साहेब पाटील यांचेसह युवक तरुण यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा :

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी

Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)

संबंधित लेख

लोकप्रिय