सातारा दि.१२– २५६ वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.(Satara)
या रॅलीमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, स्वीप नोडल अधिकारी, मुख्यलिपिक आबाजी ढोबळे, कर निरीक्षक अमित माने, अंतर्गत लेखापाल, सचिन कदम, स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार, मुख्याध्यापक परमेश्वर माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहरात सायकल बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी सहभागी होते. रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Satara


हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर