Saturday, December 7, 2024
Homeराजकारणअजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. अशातच, मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने अजित पवार यांच्या समर्थनार्थ प्रचारात सहभाग घेतला आहे. तितिक्षाने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या “घड्याळ” चिन्हाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तितिक्षा तावडेने आपल्या व्हिडिओमध्ये अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण योजना’चे कौतुक करत मतदारांना राष्ट्रवादीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्याचा अजित पवारांचा वादा आहे. “अजितदादांनी राज्यातील अडीच कोटी महिलांना ‘लाडकी बहीण’ बनवत महिन्याला 1500 रुपयांची मदत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पुढील महायुती सरकार स्थापन झाल्यावर हा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा अजितदादांचा संकल्प आहे,” असं तितिक्षा तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली.

तितिक्षा तावडेने या व्हिडिओला दादाचा वादा असा हॅशटॅग वापरत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. “महिला सशक्तीकरणासाठी अजितदादांनी दिलेला शब्द पाळण्यास मदत करूया आणि येत्या 20 नोव्हेंबरला घड्याळाचे बटण दाबा असंही तिने म्हटलं आहे.

सध्या अभिनेत्री तितिक्षा तावडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.तितिक्षाच्या या पोस्टवर सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अजित पवारांच्या प्रचाराला या व्हिडिओमुळे मोठं बळ मिळालं आहे.

Ajit Pawar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय