वाकड येथे भाऊसाहेब भोईर यांनी घेतल्या मतदारांच्या गाठी – भेटी (Bhausaheb Bhoir)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असून कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यावर भाऊसाहेब भोईर यांनी जोर दिला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा वाकडमध्ये प्रचार दौरा संपन्न झाला. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून संवाद साधला. यावेळी वाकड मधील लोकांनी भोईर यांचे जंगी स्वागत केले.(Bhausaheb Bhoir)
भाऊसाहेबांसारख्या सुसंस्कृत आमदाराची चिंचवडला गरज असल्याच्या भावना लोकांनीं व्यक्त केल्या. नागरीकांच्या मनातील आमदार निवडून देण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी मतदारांना केले.
मतदारांना आवाहन करीत असतांनाच भेटी दरम्यान अनेक विविध गोष्टींवर नागरिकांशी संवाद साधला. नागरिक उत्साहाने संवाद बैठकीत सहभागी होऊन मन मोकळे करीत होते. या भागातील सोसायट्यांचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी भाऊसाहेब प्रयत्न करतील त्यासाठी चिंचवड मध्ये आपल्याला बदल हवा आहे आणि त्यासाठीच एक मताने एक दिलाने अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
भोईर म्हणाले की ” मला मतदारांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांना एकच आवाहन करेन की आपण उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून अमूल्य असे मतदान करावे.
नागरिकांच्या न्यायासाठी व हक्कासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. (Bhausaheb Bhoir)
आज वाकडगाव परिसरात झालेल्या गाठी भेटीत आत्माराम कलाटे – वाकड, वेस्टन एवेन्यू सोसायटी – वाकड, राजाभाऊ विनोदे – हिंजवडी, भरत आल्हाट – विनोदे वस्ती, विष्णू कस्पटे – वाकड, मयूर जाधव – वाकड, ज्येष्ठ नागरिक संघ – रहाटणी, श्याम जगताप – पिंपळे गुरव, तानाजी जवळकर – पिंपळे गुरव, खंडू कोकणे – पिंपळे सौदागर, डॉ. कपिल साओजी -पेंटागोन हॉस्पिटल आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य