Friday, December 6, 2024
Homeताज्या बातम्याआनंदाची बातमी : सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव

आनंदाची बातमी : सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव

Gold-Silver Rate : आज, 16 नोव्हेंबर रोजी, आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तानंतर सोन्याच्या खरेदीला उधाण आले आहे. अशा वेळी सोन्याचे दर कमी झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून सोनं 1,300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 120 रुपयांची घट नोंदवली गेली, तर शुक्रवारी किंचित वाढ होऊन 110 रुपयांची दरवाढ झाली.

गुडरिटर्न्सनुसार , 22 कॅरेट सोनं 69,600 रुपये प्रति 10 ग्रॅम , 24 कॅरेट सोनं 75,910 रुपये प्रति 10 ग्रॅम

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार:
24 कॅरेट सोनं: 73,739 रुपये प्रति 10 ग्रॅम , 22 कॅरेट सोनं: 67,545 रुपये प्रति 10 ग्रॅम , 18 कॅरेट सोनं: 55,304 रुपये प्रति 10 ग्रॅम

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे. या आठवड्यात चांदीच्या दरात एकूण 5,000 रुपयांची घट झाली. सध्या चांदीचा दर 89,500 रुपये प्रति किलो आहे.

सोन्याच्या दरात झालेल्या घटेमुळे ग्राहकांना खरेदीसाठी सुवर्णसंधी मिळाली आहे. लग्नसराईच्या हंगामात कमी किंमतीत सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होत आहेत.

सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क कोड पाहून शुद्धता ओळखता येते.
24 कॅरेट 999 , 22 कॅरेट 916 ,18 कॅरेट 750
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर लागू होत नसल्याने सराफा बाजाराच्या दरात तफावत दिसते. सोन्याच्या किंमतीत झालेल्या या घटीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता वाढली असून, लग्नसराईच्या हंगामात बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.

Gold-Silver Rate

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय