Gold-Silver Rate: तुळशी विवाहानंतर सुरू झालेल्या लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आता सोने खरेदीसाठी उत्तम संधी मिळाली आहे. आज 14 नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे वधू-वरांचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग वाढली आहे.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 1,200 रुपयांनी घटून 75,650 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोनं 1,100 रुपयांनी कमी होऊन 69,350 रुपये प्रति तोळा मिळत आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 900 रुपयांनी कमी होऊन 56,740 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे 1 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये आहे, तर 24 कॅरेटसाठी 7,565 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 5,674 रुपये आहे.
सोन्याचे आजचे दर (प्रति 10 ग्रॅम)
-22 कॅरेट: 69,350 रुपये
-24 कॅरेट: 75,650 रुपये
-18 कॅरेट: 57,740 रुपये
सोन्याचे आजचे दर (प्रति 1 ग्रॅम)
- 22 कॅरेट: 6,935 रुपये
- 24 कॅरेट: 7,565 रुपये
- 18 कॅरेट: 5,674 रुपये
सोन्याच्या शुद्धतेसाठी आयएसओकडून हॉलमार्क दिले जाते. 24 कॅरेट दागिन्यांवर 999, 22 कॅरेटसाठी 916, आणि 18 कॅरेटसाठी 750 असे हॉलमार्क असते. त्यामुळे लग्नसराईच्या मुहूर्तावर, ही स्वस्त झालेली सोने खरेदी करण्याची संधी साधा आणि आपल्या खास प्रसंगाचे सोनेरी क्षण सजवा!
Gold-Silver Rate
हेही वाचा :
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य