Saturday, December 7, 2024
Homeराजकारणछगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रचाराच्या दौऱ्यात असलेल्या पवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेताना छगन भुजबळ यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

शरद पवार म्हणाले की, “2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, तरी मी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं. त्या काळात ‘सिनिअर’ म्हणून छगन भुजबळांचं नाव माझ्यापुढे होतं. मात्र, भुजबळांचं नंतरचं राजकारण पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तर महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक झाली असती.
त्याचप्रमाणे भुजबळांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे न गेल्याची खंत अजित पवार अनेकदा बोलून दाखवत असतात. यावर शरद पवार म्हणाले की, “त्या काळात जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजित पवार यांसारख्या तरुण नेत्यांना संधी देण्याची गरज होती, म्हणून मंत्रीपदं जास्त घेतली गेली.”

शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या निर्णयामागचं त्यांचं स्पष्टीकरण आता चर्चेचा विषय बनलं आहे.

Sharad Pawar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय