Friday, May 3, 2024
Homeआंतरराष्ट्रीयIndonesia : इंडोनेशियात ज्वालामुखीचा स्फोट, ११ हजार नागरिक सुरक्षित स्थळी हलविले

Indonesia : इंडोनेशियात ज्वालामुखीचा स्फोट, ११ हजार नागरिक सुरक्षित स्थळी हलविले

Indonesia: इंडोनेशियातील सर्वात उंच रुआंग पर्वतावरील ज्वालामुखीचे (Indonesia Volcano) दिवसभरात पाच भयानक स्फोट झाल्यानंतर सर्वत्र राख, दगड, लाव्हारस पसरला आहे. सुलावेसी बेटाच्या उत्तरेकडील पर्वतात हे स्फोट झाल्यानंतर प्रशासनाने 11000 हून अधिक लोकांना परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यास सरकारी यंत्रणांनी सुरवात केली आहे.

बुधवारी या ज्वालामुखी उद्रेकाचे इंडोनेशियाच्या भूगर्भ विभागाला समजले. त्यानंतर सरकारने लोकांना सावधानतेचा इशारा दिला. या स्फोटानंतर किनारपट्टी भागात सूनामीचा (tsunami)
इशारा सरकारने किनारपट्टीतील भागात दिला. Indonesia news

या ज्वालामुखीचे स्फोट अजूनही सुरू आहेत, त्याची भयानक दृश्ये सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेत.

रुआंग ज्वालामुखीपासून किमान सहा किलोमीटर दूर राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. अधिकारी चिंतित आहेत की ज्वालामुखीचा काही भाग समुद्रात कोसळून त्सुनामी होऊ शकते, अशा प्रकारचा उद्रेक 1871 मध्ये घडून सुनामी आली होती,असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
इंडोनेशियामध्ये 147 ज्वालामुखी आहेत आणि त्यापैकी 76 सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि ते जावा, लेसर सुंदा, सुमात्रा आणि सेलेब्स बेटांवर पसरलेले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय