Tuesday, May 7, 2024
Homeआंतरराष्ट्रीयAnti war protest : अमेरिकेत विद्यार्थी रस्त्यावर उतरले

Anti war protest : अमेरिकेत विद्यार्थी रस्त्यावर उतरले

वॉशिंग्टन : अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी युद्ध विरोधी आंदोलने सुरू आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून इस्रायल विरोधी घोषणा देत आहेत.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख विद्यापीठांमध्ये युद्ध विरोधी (antiwar protest) पॅलेस्टाईन समर्थक शेकडो आंदोलकांना अटक केली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (USC) मध्ये जवळपास १०० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून हार्वर्ड व ब्राउन विद्यापीठांमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे.

‘अल जझीरा’च्या वृत्तानुसार स्टॅनफोर्ड विद्यापीठ, येल विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ आणि एमआयटी यांसह संपूर्ण अमेरिकेतील किमान ३० विद्यापीठांमध्ये अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांनी ही मोठी निदर्शने सुरू केली आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरुन इस्त्रायलला सातत्याने विरोधाचा सामना कराला लागत आहे. महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेत लोक खुलेपणाने इस्त्रायलचा विरोध करत आहेत.

इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे, यामध्ये ३३ हजार पॅलेस्टाइन नागरिक, मुले, महिला मृत्युमुखी पडल्या आहेत, तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायल गाझा आणि इराण, सीरिया आदी ठिकाणी सातत्याने हल्ले करत आहे. तर इस्त्रायल वर रॉकेट हल्ले सुरू आहेत. Student protest news

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात सुमारे १०० आंदोलक विद्यार्थ्यांना आणि बुधवारी ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठात डझनभर अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली. बुधवारी बोस्टनमधील इमर्सन कॉलेजमध्ये पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय