Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आदर्श आचासंहितेसाठी सहा भरारी पथकांची अहोरात्र गस्त सुरू

PCMC : आदर्श आचासंहितेसाठी सहा भरारी पथकांची अहोरात्र गस्त सुरू

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी ३३ मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविणेकामी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दिपक सिंगला व सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांचे मार्गदर्शनाखाली २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण १२ स्थिर सर्व्हेक्षण पथके (SST) स्थापन करण्यात आली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, दोन पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सदर पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांचेमार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ / मद्य, हत्यारे इ. बाबत प्रतिबंध करणेकामी दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे व नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. pcmc news

त्याचबरोबर २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ (chinchwad) कार्यक्षेत्रासाठी सहा भरारी पथके (FST – Flying Surveillance Team) कार्यरत करण्यात आलेली आहेत. सदर पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, एक पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सदर पथके तीन पाळयांमध्ये २४ तास कार्यरत असून त्यांचेसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे. PCMC


मा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, आचारसंहिता कक्ष, cVigil इ. द्वारे आचारसंहितेबाबत प्राप्त तक्रारींवर तात्काळ व विहीत मुदतीत कार्यवाही करण्यात येत आहे.

निवडणूक लढवणा-या उमेदवारांमार्फत घेण्यात येणा-या परवानगी प्राप्त प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा इ. चे प्रत्यक्ष कार्यक्रमाचे ठिकाणी चित्रीकरण करणेकामी एकूण पाच VST (Video Surveillance Team) स्थापन करण्यात आली आहेत.

सदर पथकामध्ये प्रत्येकी दोन दंडाधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश असून त्यांचेसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे. pcmc news

VST द्वारे चित्रीकरण करण्यात आलेल्या चित्रफितीची (CD) ची पाहणी करणेकामी दोन VVT (Video Viewing Team) स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी चार कर्मचा-यांचा समावेश आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात आलेली भाषणे तपासणे तसेच उमेदवारामार्फत प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा इ. दरम्यान वापरण्यात आलेले प्रचार साहित्य, वाहने, भोजन व्यवस्था व कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची आकडेवारी इ.चा अहवाल विहीत नमुन्यात मा. सहा. खर्च निरीक्षक यांना नियमीत पाठविणेत येत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय