संगीत, नृत्य, भजन, नारदीय कीर्तन श्रवण पर्वणी Alandi
Alandi / अर्जुन मेदनकर : येथील श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट संस्थापिका कै. चंद्रभागाबाई आवेकर यांनी इंद्रायणी (alandi )किनाऱ्यावर श्री राम मंदिर सन १८४० मध्ये लक्षवेधी बांधले. श्रीराम मंदिरात श्रींचा जन्मोत्सव १८४ वे वर्ष साजरे करीत आहे. या निमित्त मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि पुष्प सजावट करण्यात आली आहे. आळंदी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रीराम नवमी उत्सवाचे कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आवेकर भावे रामचंद्र संस्थान चे वतीने करण्यात आले आहे. Alandi NEWS
श्री राम मंदिरात राम नवमी (ram navami) निमित्त १७ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे परंपरेने उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यकमांत संगीत, नृत्य, भजन, नारदीय कीर्तन ९ ते १७ एप्रिल या कालावधीत होत असल्याचे आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे सरपंच संजय आवेकर यांनी सांगितले.
या धार्मिक उत्सव पर्वणीत ह. भ. प. वासुदेवबुवा बुरसे यांची नारदीय कीर्तन सेवा सुरु आहे. यास गायक श्यामजी गो-हाणे (तबला), नाना पांढरे (हार्मोनियम) साथ देत आहेत.
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात डॉ. परिमल फडके यांचे भरतनाट्यम कार्यक्रमास उपस्थितांची मोठी दाद मिळाली. ह.भ.प. ज्ञानेश्वरी रोकडे, पंढरीनाथ रोकडे, निवृत्ती महाराज दाभेकर यांची भजन सेवा त्यानंतर गीतरामायण स्वरांजली उत्साहात झाली. मुक्ता कुलकर्णी यांनी श्रीरामाचे भक्तवैभव सादर केले. सुनीता गुणे यांनी गीत सुद्धा रामायण सादर केले. आबासाहेब गोडसे, निवृत्ती गोडसे यांनी वारकरी भजन सेवा रुजू केली. आरती सरदेसाई यांचे भक्तीगीत व भावगीत सादरीकरण झाले.
शनिवारी ( दि.१३ ) अभिषेक तेलंग श्रीरामाची गाणी, वैभव दातार अपरिचित रामायण सादर करणार आहेत. रविवारी ( दि. १४ ) दत्ता चितळे आणि सहकारी यांचे गीतरामायण होईल. सोमवारी ( दि. १५ ) ज्योती गो-हाणे, सोहं गो-हाणे आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वनिवुन अभंग आणि भक्तिगीते सादर करतील. मंगळवारी ( १६ ) राधाकृष्ण महाराज गरड भजन सेवा, अंतर्यामी सूर पं. श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली गाणी होणार आहेत. यावेळी अभिजित पंचभाई, दीप्ती कुलकर्णी आणि सहकारी साथ सांगत देणार आहेत. बुधवारी ( दि. १७ ) रोजी श्रीराम जन्मोत्सवावर आधारित बुरसे महाराज यांची नारदीय कीर्तन सेवा, महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी साडेपाच वाजता श्री रामाची पालखी नगरप्रदक्षिणा होऊन रामजन्मोत्सवाची सांगता होईल.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !