Monday, May 6, 2024
Homeजिल्हाSFI: वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू करा – एसएफआय

SFI: वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू करा – एसएफआय

वडवणी : वडवणी तालुका निर्मिती होऊन दोन दशके उलटली तरी अद्याप वडवणी तालुका हा विकासापासून कोसो दूर आहे. या कडे स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. वडवणी तालुक्यातील ग्रामीण भागात देखील रस्ते पाणी, विज, बससेवा अश्या अनेक समस्या आहेत. वडवणी तालुक्याचे ठिकाण असून येथे बसस्टँड नाही तर ग्रामीण भाग व शहरी भागाला जोडण्याचे काम करणारी एस. टी. महामंडळाची बस अनेक गावापर्यंत अद्याप पर्यंत पोहचली देखील नाही. यामुळे शहरी भागात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व विविध कार्यालयीन व खाजगी कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील साळींबा, पिंपरखेड, देवडी, कवडगाव, खळवट लिमगाव व पंचक्रोशीतील गावांमध्ये बस सेवा सुरू व्हावी यासाठी एसएफआय (SFI) विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेतला असून या संदर्भात धारूर आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील ग्रामीण भागात दळणवळणाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत तसेच एस.टी. महामंडळाची बस सेवा देखील उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागामध्ये ये जा करण्यासाठी व नागरिकांना कार्यालयीन व खाजगी कामासाठी ये जा करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर बाब लक्षात घेता स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांची व नागरिकांची समस्या लक्षात घेता १) धारूर – -वडवणी – देवडी २) माजलगाव- देवडी – वडवणी – बीड ३) धारूर – वडवणी – पिंपरखेड नाथापूर – जातेगाव – गेवराई – छत्रपती संभाजीनगर या सदरील ३ बस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

यासाठी धारूर आगार प्रमुख श्री चौरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हाध्यक्ष लहू खारगे, तालुका सचिव अभिषेक अडागळे, आकाश गायकवाड यांच्या सोबत माकपचे कॉ.डॉ.अशोक थोरात, किसान सभेचे नेते कॉ. काशिराम शिरसट आदी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय