Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरीतील सात वर्षीय मोहम्मद अलीने पूर्ण केले रमजान चे ३०...

PCMC : पिंपरीतील सात वर्षीय मोहम्मद अलीने पूर्ण केले रमजान चे ३० रोजे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मुस्लीम धर्मात रमजान (ramdan) महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. बहुतांशी मुस्लिम धर्मीय या महिन्यात सलग ३० दिवस दररोज उपवास करून नमाज अदा करतात. या निर्जल उपवासांना फार महत्व आहे. पिंपरीतील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अली मोतसिम दळवी या सात वर्षांच्या चिमुकल्याने यावर्षी ३० उपवास पूर्ण केले. एवढ्या लहान वयात त्याने केलेल्या उपवासांबाबत त्याचे मुस्लिम बांधवांकडून कौतुक केले. जात आहे. pcmc

मोहम्मद अली हा पिंपरीतील ज्युडसन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. त्याचे वडील पिंपरीत वाहनचालक म्हणून काम करतात तर आई समिया या गृहिणी आहेत. मोहम्मद अली याने गतवर्षी देखील सलग २० दिवस रमजानचे उपवास केले होते. कोवळे वय आणि कडक उन्हाळा अशा परिस्थितीत त्याने हे उपवास पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इस्लामिक कॅलेंडर नुसार नववा महिना रमजानचा असतो. या महिन्याला मुस्लीम समाजात सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जल उपवास केला जातो. पहाटे सूर्योदयाला सहेरी करून उपवास ठेवला जातो आणि सूर्यास्त झाल्यानंतर खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते देखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात. pcmc news

मोहम्मद अली ने देखील दररोज दिवसाचे १४ तासांहून अधिक काळ उपवास केला. शाळेची दिनचर्या सकाळी ७ ते २ सांभाळून त्याने कुठेही न ढळता हे उपवास पूर्ण करीत तसेच महिनाभर नमाज अदा करीत अल्ल्हाची इबादत केली आहे. त्याने केलेले व्रत समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे त्याचे शहरभर कौतुक होत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय