Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जोरदार टीका टीपण्णी सुरू आहे. भंडाऱ्यातील सभेत अमित शहांनी (Amit shah) उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या पक्ष फुटीवर देखील त्यांनी भाष्य केले. शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला. यावर आता उद्धव ठाकरेनी प्रत्यूत्तर दिले आहे.
भंडाऱ्यातील सभेत अमित शहा (Amit shah) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. दे दोघे सातत्याने भाजपने आमचा पक्ष फोडला, असे म्हणत असतात. पण महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचे आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष भाजपने फोडले नाहीत. तर तो उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटल्याचे वक्तव्य केले. तसेच शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला. असेही ते म्हणाले. यावर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत अमित शहांना जहरी टोला लगावत प्रत्यूत्तर दिले.
उद्धव ठाकरेंचे प्रत्यूत्तर
अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्यूत्त दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या पुत्रप्रेमामुळे टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हारला. माझं पुत्र प्रेम तसं नाही. अमित शाह यांचं पक्षातील स्थान नक्की काय आहे? भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना किती अधिकार असतात, हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह जे बोलतात त्यामध्ये आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. तुम्ही सांगता की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अमित शाह यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, ‘असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे ‘बीसीसीआय’ मध्ये वरिष्ठ पदावर आहेत. 2023 मध्ये विश्वचषक झाला. याचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला अंतिम सामना भारतानं हरला होता.
हे ही वाचा :
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला
ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !
…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र
मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार