Saturday, May 4, 2024
Homeताज्या बातम्याUdayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जागा वाटपासाठी महायुतीमध्ये अनेक जागांसाठी संबंध ताणल्याचे बघायला मिळाले. साताऱ्याच्या जागेसाठी देखील उदयनराजे भोसले यांना अनेक दिवसांपासून वेटींगवर ठेवण्यात आले होते. मात्र आता भाजपने उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे सुरूवाती पासून इच्छूक होते. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले हे दिल्लीत गेले होते. दिल्लीत जाऊन देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी उदयनराजे यांना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली होती. शहांना भेटून साताऱ्यात परतल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. आज अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, साताऱ्याच्या पोटनिवडणूकीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकली. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर लढलेले उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता.

गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीनं जिंकल्यानं साताऱ्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीतील या जागेवरील तिढा वाढला होता. अखेर ही जागा भाजपला मिळाली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय