Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरJunnar: डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Junnar: डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Junnar: वडगाव आनंद (ता.जुन्नर) गावाच्या परिसरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. या परिसरात पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या मोठ्या घटना घडत असल्याने पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Junnar

मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा परिसरातील वडगाव आनंद गावच्या परिसरात चार चाकी आणि मोठ्या वाहनांमधील डिझेलची चोरी झाल्या बाबत रुपेश ज्ञानेश्वर वाळुंज (वय, ३० वर्षे) यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्या नंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे एक तपास पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना संशयीत इसम कुणाल रोहिदास बोंबले, ओंकार काळुराम देवकर, राहुल संजय हिंगे (सर्व रा.राजगुरूनगर, ता. खेड, जि. आंबेगाव) यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असताना सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

त्याच्या कडून चोरीस गेलेला मुद्देमाल २ कार व ६० लिटर डिझेल असा एकूण १७ लाख ५२ हजार ४११ रुपये हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांनी यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवलदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, प्रवीण आढारी, नवीन अरगडे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलीस हवालदार भिमा लोंढे हे करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय