Thursday, October 10, 2024
Homeजिल्हाप्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

शिर्डी : नगरसुल ते शिर्डी दरम्यान प्रवासी वाहतुक करू देण्याच्या मोबदल्यात महिन्याला साडे तीन हजार रूपयाच्या लाचेची लाच स्विकाल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर वाहतूक पोलिसाला अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Anti Corruption Bureau)

याप्रकरणी प्रकाश दशरथ पिलोरे Prakash Dashrath Pilore (पोलिस नाईक, नेमुणक – शिर्डी शहर वाहतूक शाखा (Shirdi Traffic Branch), जि. अहमदनगर) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या 3 वाहनांना नगरसुल ते शिर्डी दरम्यान प्रवासी वाहतुक करू देण्याकरिता पोलिस नाईक प्रशाक पिलोरे यांनी साडे तीन हजार रूपये दरमला हप्ता म्हणून द्यावे लागतील असे सांगितले होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 13 जून 2023 रोजी एसीबीने सापळा रचला. पोलिस नाईक पिलोरे यांनी शिर्डी पोलिस स्टेशनच्या समोर तक्रारदाराकडून सरकारी पंचासमक्ष 3 हजार 500 रूपये लाच म्हणून घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक विश्वजीत जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हे ही वाचा :

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

व्हायरल व्हिडिओ : ‘आ रे प्रीतम प्यारे’वर पठ्ठ्याचा भर बाजारात डान्स; मुली लाजल्या, महिला पाहतंच राहिल्या

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

नोकरीच्या बातम्या वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय