Monday, May 20, 2024
Homeजिल्हाभीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता - पुतणे जागीच...

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

पाटस : पुणे सोलापूर महामार्गावर नेहमीच विचित्र अपघात होत असतात. त्यात कित्येकदा छोट्याश्या चुकीमुळे अनेकांचे नाहक बळी जातात. दौंड येथील भागवतवाडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली व मालवाहतूक करणारा ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चुलता-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. १५) पहाटे २ वाजेच्या सुमारास पाटस भागवतवाडी याठिकाणी हा अपघात झाला.

यामध्ये ट्रकचालक बिभीषण बालाजी हाके (वय ३२) तर वैभव सुधाकर हाके (वय १८, रा. घोटाळा बंडगरवाडी, ता. बसवकल्याण, रा. कर्नाटक) असे मृत्यूमुखी पडलेल्या चुलता- पुतण्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील भागवतवाडी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्ता पार करत असताना पुणे दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने (केए-३९/९४५५) ट्रॅक्टरच्या ट्रेलरला धडक बसल्याने ट्रकचा चेंदामेंदा झाला.

ट्रक चालक असणाऱ्या बिभीषण हाके व त्याच्या सोबत असणारा त्याचा पुतण्या वैभव हाके याचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस शिपाई समीर भालेराव, संदीप कदम, हनुमंत भगत घटनास्थळी हजर झाले. दोन तासानंतर पुणे सोलापूर महामार्ग खुला करून देत मृतदेह बाहेर काढले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

नोकरीच्या बातम्या वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय