Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाब्रेकिंग : मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुणे सातारा महामार्गावर दोन तीन दिवसांपुर्वीच भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर 23 जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर एक मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन जाणाऱ्या भरधाव टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर स्लिप होऊन रस्त्यावर आडवा झाला. यामुळे वाहनातील केमिकल रस्त्यावर पसरले. यानंतर वाहनाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.

टँकरचा अपघात झाल्यानंतर पुला खालून जाणाऱ्या वाहनांवरही केमिकल पडले. त्यातील खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. यात ते होरपळले. या सोबतच पुलाखालील दोन ते तीन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. या आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या.

दरम्यान, या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या.

हे ही वाचा :

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा

आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय