Thursday, May 9, 2024
Homeराज्यपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व  कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.

पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी  कशाप्रकारे करावा या संदर्भातील उद्बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt  या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाठ्यपुस्तक मंडळाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा

आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय