Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयखळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

नवी दिल्ली : ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सीने यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. किसान आंदोलनावेळी ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यासाठी मोदी सरकार ट्विटर बंद करण्याची आणि छापेमारीची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले होते. अनेक महिने त्यांनी दिल्लीत जोरदार धरणे आंदोलक केले होते. दिल्लीच्या सीमा देखील शेतकऱ्यांनी ब्लॉक केल्या होत्या. त्यानंतर आता ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सीने मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. किसान आंदोलनावेळी सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी भारत सरकारने आपल्यावर दबाव आणला होता आणि भारतात ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती, असा दावा डॉर्सी यांनी केला आहे.

एका मुलाखतीदरम्यान जॅक डॉर्सी यांनी म्हटले आहे की, किसान आंदोलनावेळी भारत सरकारने काही ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन न केल्यास सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही, नियम न पाळल्यास ट्विटरचे कार्यालय सुद्धा बंद करू अशी धमकी सुद्धा दिली होती’.

दरम्यान, डॉर्सी यांच्या या दाव्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे देशभरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी फेटाळला दावा…

मोदी सरकार मधील केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डॉर्सी यांचा दावा फोटाळला आहे. चंद्रशेखर ट्विट करत म्हटले आहे की, डॉर्सीच्या नेतृत्वाखाली ट्विटर आणि त्याची टीम सतत भारतीय नियमांचे उल्लंघन करत होती. 2020- 2022 दरम्यान अनेकवेळी त्यांनी नियम तोडले आहेत. डोर्सीच्या ट्विटरला भारतीय कायद्याचे सार्वभौमत्व स्वीकारण्यात अडचण येत होती, असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा

आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय