Friday, May 17, 2024
Homeराजकारणआळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची - गृहमंत्री फडणवीस

आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

आळंदी, (दि.11) : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. मात्र यावेळी मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला. त्यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला आहे.

वारकऱ्यांनी लाठीचार्ज केल्याच्या आरोपावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरासावर केली आहे. फडणवीस यांनी लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची झाल्याचे म्हटले आहे.

लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षीची स्थिती पाहता यावेळी बैठकीत मनाचा दिंड्यासाठी 75 पासेस देत आत सोडण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून चेंगरा चेंगरी होणार नाही. त्याप्रमाणे आज मनाच्या दिंड्याचे लोक पोहचले होते. परंतु इतर लोकांनी आत घुसण्याचा आग्रह केला आणि बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना थांबवण्यात आले, परंतु लाठीचार्ज झाला नाही असे म्हटले आहे.

आळंदीत किरकोळ झटापट – चौबे, पोलिस आयुक्त

पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे असे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले.

हे ही वाचा :

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय