Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune: एस.एम.जोशी कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

Pune: एस.एम.जोशी कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

Pune/ डॉ.अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॅालेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती विविध उपक्रमांनी संपन्न झाली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इतिहास विभाग, मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Pune News

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार’ या विषयावर सी. टी. बोरा महाविद्याल‌य शिरूर येथील मराठी विभागातील प्रो. डॉ. राजाभाऊ भैलुमे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना स्पर्श केला. भारतामध्ये विविध जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणायचे असेल तर समतेचे तत्व लागू करावे लागेल. ते तत्व राज्यघटनेतील कायद्यातुन रुजवावे लागेल. असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. शोषित वर्गाच्या कल्याणासाठी, तसेच त्यांनी कामगारांसाठी कायदे केले. स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्यासाठी ‘शारदा’ कायदा मंजूर करण्यासाठी योगदान दिले.

सर्वांना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश, चवदार तळे सत्याग्रह केला. गुलामाला गुलामिची जाणिव करून दिल्याशिवाय तो आपले हक्क, मिळवण्यासाठी पेटून उठणार नाही. याची जाणीव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही त्यांचे चिंतन होते. सामाजिक बदलासाठी समाजमनामध्ये बदल घडवला पाहिजे व हा बदल घडविण्यासाठी शिक्षण हा पाया आहे. असा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. दलित, बहुजन समाजाला विकसित करायचे असेल तर त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे, कारण ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे’ याची जाणिव त्यांना होती, असेही डॉ.भैलुमे म्हणाले. Pune News

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महामानवांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे स्मरण करून चालणार नाही. तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. बहुजन समाजासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानले होते. महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणासाठी जे कार्य केले त्याचाच वारसा घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिक्षण संस्था स्थापन केल्या. समाजप्रबोधनासाठी वृत्तपत्रे सुरू केली. कामगारांच्या हक्कासाठी राजकीय पक्षही स्थापन केला. अर्थशास्त्रातही त्यांचे काम उल्लेखनिय आहे. ते एक उत्तम वकिलही होते. अशा प्रकारे प्राचार्य डॉ.काकडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जडे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग, इतिहास विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.

यावेळी ग्रंथालय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. इतिहास विभागातर्फे पोष्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभागातील प्रा. डी. डी. गायकवाड, प्रा.प्रांजली शहाणे तसेच ग्रंथपाल प्रा.शोभा कोरडे, मराठी विभागप्रमुख डॉ.अतुल चौरे, डॉ.संदीप वाकडे, प्रा.अविनाश जाधव यांचे सहकार्य लाभले. सर्व मान्यवरांचे आभार प्रा.गजानन घोडके यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ.धनंजय भिसे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय