Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याShirur Loksabha: अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव...

Shirur Loksabha: अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

Shirur Loksabha : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha) देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केल्याची टीका माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार आढळराव पाटील यांनी पुण्यातील पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जनतेचा माझ्यावर विश्वास असून हडपसर मतदार संघातून कमीत कमी एक लाख मतांचा लीड मला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या गावात स्वतःचे काही दिसत नाही. कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं. मात्र त्या गावात आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं पाण्याचे टँकर सुरू करून त्यांना पाणी पुरवठा केला.

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं पाण्याची जास्त पाणीटंचाई निर्माण झालीय. आमच्या काही संस्था तसंच काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या गावातही आम्ही पाणी पुरवठा केल्याची टीका त्यांनी केली. तसेच स्वतःच्या तालुक्यातील त्यांनी दत्तक घेतलेल्या गावात काही नाही. ते राज्याचं काय सांगत आहेत?” असा सवालही आढळराव पाटील यांनी केला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख

लोकप्रिय