Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune: फनफेअर मध्ये विजेचा झटका लागून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Pune: फनफेअर मध्ये विजेचा झटका लागून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Pune : पुण्यातील कात्रज (katraj) येथे फन फेअर मध्ये खेळत असताना एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना 13 एप्रिलच्या शनिवारी रात्री घडली आहे.

कात्रज येथील राजस सोसायटी चौकानजीक लहान मुलांना खेळण्यासाठी फनफेअर पार्क आहे. याठिकाणी करमणूकी साठी पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाउस अशी साधने उभी करण्यात आली होती. काही प्रवेश फी आकारून लहान मुलांना करमणूकीसाठी लोक येथे येत असतात. पार्कमधील पाळण्यामध्ये बसताना लोखंडी पायरीवरून चढत असताना शॉक लागून मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून देण्यात आली.

मुलासोबत त्याचे मित्र खेळायला आले होते. शॉक लागून बेशुद्ध झालेल्या मुलाला त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेची माहिती पोलिसांना आणि मृताच्या कुटुंबियांना दिली. परिसरात या घनटेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune)

उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू (death) झाला असून शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशा मुळे झाला याची माहिती मिळेल असे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय