Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्यामुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीत दगड फेक, डोळा थोडक्यात वाचला

मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीत दगड फेक, डोळा थोडक्यात वाचला

Jagan Mohan Reddy : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्यावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. शनिवारी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे निवडणूक प्रचार करताना त्यांच्यावर दगडफेक झाली. या घटनेत मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) हे जखमी झाले आहे.

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) हे विजयवाडा येथील सिंह नगर येथील विवेकानंद स्कूल सेंटरमध्ये जमावाला संबोधित करत असताना अचानक दगडफेक झाली, असे मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बसच्या वरच्या भागातून मुख्यमंत्री नागरिकांना अभिवादन करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यावेळी अत्यंत वेगाने आलेला दगड रेड्डी यांच्या कपाळाला लागला.

या दगड फेकीत रेड्डी यांचा डोळा थोडक्यात वाचला आहे. त्यांच्या डोक्याला खोच पडली असून दोन टाके देखील पडले आहेत. हा दगड गोफणीतून सोडण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक उपचारानंतर जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी बसचा प्रवास सुरू ठेवला.

हा हल्ला लक्ष्य करून करण्यात आल्याचे दिसत असल्याने घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री आणि आमदार या दोघांनाही निवडणूक प्रचारासाठी खास तयार केलेल्या बसमध्ये तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. प्रथमोपचार करून जगन मोहन रेड्डी यांनी आपला बस प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

वायएसआर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या हल्ल्यामागे विरोधी गट, विशेषत: तेलुगू देसम पक्षाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, अद्याप कोणत्याही आरोपांची पुष्टी झालेली नाही.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख

लोकप्रिय