Monday, May 6, 2024
Homeजिल्हाSFI: विद्यापीठाच्या वसतिगृह शुल्क वाढीच्या विरोधात एसएफआय आक्रमक; प्रशासनास निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा!

SFI: विद्यापीठाच्या वसतिगृह शुल्क वाढीच्या विरोधात एसएफआय आक्रमक; प्रशासनास निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा!

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करणारा अन्यायकारक वसतिगृह शुल्क ६० टक्क्याने वाढीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क माफ करण्यात यावे या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) छत्रपती संभाजीनगर जिल्हा समिती व विद्यापीठ समितीच्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ.प्रशांत अमृतकर यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन देत असताना एसएफआय च्या शिष्टमंडळाने कुलसचिवांशी सविस्तर चर्चा केली व मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थि प्रचंड आर्थिक विवंचनेचा सामना करत आहेत अशा परिस्थितीत विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी विद्यार्थ्यांना अडचणीत आणणारे अतिशय चुकीचे निर्णय विद्यापीठ प्रशासन घेत असल्याची स्पष्ट भूमिका एसएफआय ने मांडली.

विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन व भीषण दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आर्थिक व मानसिक शोषणाला सहायक ठरेल असा वसतिगृह फिस वाढीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा व मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क,परीक्षा शुल्क व वसतिगृह शुल्क तात्काळ माफ करण्यात यावे. अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली.यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास विद्यापीठ प्रशासनाविरोधात येत्या सात दिवसात एसएफआय विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडलं व हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी निवेदन देते वेळी एसएफआय च्या शिष्टमंडळात SFI राज्य समिती सदस्य अनुजा सावरकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहसचिव अमरदीप अवचार, जिल्हा समिती सदस्य गणेश अलगुडे, SFI विद्यापीठ समिती उपाध्यक्ष प्रकाश वाव्हळे, सहसचिव कुलदीप कासार, विद्यापीठ समिती सदस्य काजल खरात, अमृता मिथे, प्रकाश खरसाडे, समता टोमके इ.विद्यार्थी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय