Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दुर्गा नगर एसआरए (SRA) प्रकल्पात १०० सदनिकांचा घोटाळा प्रकरण

PCMC : दुर्गा नगर एसआरए (SRA) प्रकल्पात १०० सदनिकांचा घोटाळा प्रकरण

उच्च न्यायालयाचा आदेश – परिस्थिती जैसे थे ठेवून प्रशासनाला दहा जूनपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश pcmc

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दुर्गा नगर एसआरए प्रकल्पाचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने सुरू केले आहे. दुर्गा नगर आणि शरद नगर येथील झोपडीधारकांसाठी ३६० सदनिका बांधून तयार आहेत. त्यापैकी काहीचे वाटप झाले आहे.

परंतु दुर्गा नगर येथील झोपडी झोपडीधारकांना डावलून महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील कर्मचारी, अधिकारी, पोलीस व या भागातील पुढारी मंडळी मूळ झोपडीधारकांना डावलून बेकायदेशीररित्या दुर्गा नगर येथील त्यांच्या झोपड्या पाडत आहेत.

याबाबत येथील रहिवासी मुमताजबी गफुर जामदार, ज्ञानेश्वर पांडुरंग गारगोटे आणि इतरांनी उच्च न्यायालयात (high court) धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेत दुर्गा नगर आणि शरद नगर पुनर्वसन प्रकल्पाची परिस्थिती जैसे थे ठेवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास दहा जूनपर्यंत म्हणणे मांडण्याचे तसेच तीन महिन्यांत अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकाराबद्दल दुर्गा नगर आणि शरद नगर येथील झोपडीधारकांचे समन्वयक विलास घाडगे यांनी वेळोवेळी एसआरए अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन (pcmc) आणि पोलिसांशी पत्रव्यवहार केला परंतु दखल घेतली नाही.

याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर एसआरए अधिकाऱ्यांना याबाबत चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ३५ झोपड्या बाकी आहेत त्या पाडण्यासाठी विकसक यांनी स्थानिक गुंड यांना हाताला धरून रात्री सात नंतर झोपड्या पाडण्याचे बेकायदेशीर काम केले आहे. pcmc news

या झोपडीधारकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांना त्यांच्या न्याय हक्काची झोपडी मिळालीच पाहिजे यासाठी प्रशासनाचा निषेध करून आंदोलन ही करण्यात आले होते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे विलास भागवत घाडगे, दीपक हणमंत हलूरकर, बाबासाहेब भगवान गोरे, अब्दुल जमादार, सीता विठ्ठल नांदवते, बाबासाहेब कदम, आतिश दिलीप कदम, प्रशांत दिलीप कदम, प्रमिला पांडुरंग शिंदे यांनी स्वागत केले असून न्यायालय आम्हाला योग्य न्याय देईल अशी भावना व्यक्त केली.

या ठिकाणी प्रशासनाने बोगस सर्वे केला, बोगस नोंदी केल्या आहेत, मृत व्यक्तींच्या नावे बोगस खरेदी दाखवून दुसऱ्याच्या नावे खोटे खरेदीखत केले आहे. दुर्गा नगर मध्ये मूळ झोपडी मालकांमध्ये एकही बोबडे आडनावाची व्यक्ती नसतानाही जवळपास आठ बोबडे नावाच्या व्यक्तींना सदनिका देण्यात आले आहेत. यामध्ये अशोक संदिपान बोबडे, विकास झुंबर पुळवले, सविता अरुण तूरुकमारे हे बोगस असल्याने त्यांची कागदपत्रे तपासली जावीत. तसेच मूळ झोपडीधारक विठ्ठल लक्ष्मण फुटक, पांडुरंग कोंडीबा शिंदे, गोकुळदास उत्तमराव घुले, चांगदेव काशिनाथ तांदळे व इतर हे मृत झाल्यानंतर त्यांच्या नावे बोगस कागदपत्र सादर करून खरेदीदार यांनी शासनाची फसवणूक करून मूळ झोपडीधारकांवर अन्याय केला आहे. याची देखील चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे विलास घाडगे म्हणाले. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय