पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : “मतदान हा प्रत्येक भारतीयांचा मूलभूत हक्क आहे,तो बजावण्यासाठी सर्वांनी १३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणूकीसाठी वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क बजावावा आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन दापोडी येथील विनियार्ड वर्कर्स चर्चचे संस्थापक पास्टर डॉ. पीटर सिलवे आणि पास्टर डॉ.जयश्री सिलवे यांनी केले. (PCMC)
रविवार १४ एप्रिल रोजी प्रार्थनेसाठी १२ हजारांपेक्षा अधिक नागरिक जमले होते, त्यांना मार्गदर्शन करताना पास्टर डॉ. पीटर सिलवे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्वांना मतदानाची शपथही दिली, यावेळी पिंपरी विधानसभेचे (pcmc) नोडल अधिकारी मुकेश कोळप आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. pcmc news
त्या अनुषंगाने १३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या रविवारच्या सभेचे औचित्य साधून मावळ मतदार (maval loksabha 2024) संघातील ख्रिस्ती बांधवांशी मतदान जनजागृतीसाठी संवाद साधण्याचे आयोजन करण्यात आले होते. pcmc news
यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेतली आणि मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
तर विनियार्ड चर्चने नेहमीच विविध माध्यमातून विविध लोकजागृतीेचे कार्य केले आहे व करीत असल्याचा संदेश आजच्या कार्यक्रमातून पास्टर डॉ.पीटर सिलवे यांनी जनसमुदायास दिला.
हे ही वाचा :
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला
ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !
…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र
मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार