Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपळे निलख मध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी

PCMC : पिंपळे निलख मध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपळे निलख, गणेशनगर (pcmc) येथील सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकटन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली. pcmc news

स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आठवडाभर भजन सप्ताहाचे आयोजन केले होते. यानिमित्त पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी उपस्थित राहून भजन सेवा केली. तसेच बुधवारी स्वामी समर्थांच्या प्रकटन दिना पहाटे श्रींना महाअभिषेक, त्यानंतर होम हवन करण्यात आले.

संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची परिसरातून ग्रामप्रदक्षिणा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पिंपळे निलख (pcmc) पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते, विशेषतः युवक, महिलांचा समावेश उल्लेखनीय होता. ग्रामप्रदक्षिणेनंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आले. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. pcmc news

तसेच बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांची रक्तदाब तपासणी, महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, क्ष किरण, रक्तातील साखरेची तपासणी, रक्तातील सर्व घटक, कोलेस्टेरॉल, डोळे तपासणी करण्यात आली. सुमारे अडीचशे जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली.

सचिन साठे सोशल फाउंडेशन, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि पिंपळे निलख ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय