Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar : जुन्नरमधील अदानींच्या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, ग्रामसभेची मान्यता न घेता परिसराचे...

Junnar : जुन्नरमधील अदानींच्या प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, ग्रामसभेची मान्यता न घेता परिसराचे सर्वेक्षण?

Junnar : जुन्नर तालुक्यातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. मागील वर्षी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध झाल्याने सर्वेक्षण झाले नाही. मात्र आता पुन्हा या परिसरात ग्रामसभेची मान्यता न घेता ड्रोनद्वारे सर्व्हे केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. Junnar News

पश्चिम आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला विरोध असताना येथील सर्वेक्षणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने सर्व्हे साठी या भागात ड्रोनचा वापर होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू असल्याने या क्षेत्रात कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाल्यास त्या प्रकल्पाला ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. असे असताना या भागात पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन फिरतातच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अंजनावळेच्या ग्रामपंचायत सदस्य दिनाबाई कोकणे यांनी देखील आमची फसवणूक करून सर्वे केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काही लोक आम्ही सहज ठाणे जिल्ह्यातून पाहुणे म्हणून आल्याचे सांगत त्यांनी ठेकडावर जाऊन परिसराची पाहणी केली. त्यांच्याकडे ड्रोन, दुर्बीण असल्याने तुम्ही कशासाठी आलात ? काय बघता ? इथं तुम्ही सर्वेसाठी आलात का, अशी विचारणा करत ग्रामस्थांनी त्यांना पळवून लावले. Junnar News

पुढे कोकणे म्हणाल्या, गेले तीन दिवस अंजनावळे परिसरात ड्रोन फिरत होते, आमचा या प्रकल्पाला पुर्णपणे विरोध आहे, आम्ही ही जागा सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये २८ जून २२ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार उर्जा साठवण प्रणाली तसेच इतर अक्षय ऊर्जा स्त्रोत प्रकल्पाच्या घाटघर व अंजनावळे ता.जुन्नर गावातील सर्व्हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी मार्फत करण्यात येणार आहे. त्यांना सहकार्य करावे असे पत्र तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मागील वर्षी दोनही ग्रामपंचायतीला दिले होते.

पेसा कायद्याची पायमल्ली

आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या गावात पेसा कायदा लागू आहे. पेसा कायद्यानुसार या क्षेत्रात कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाल्यास त्या प्रकल्पाला ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. या प्रकल्पासाठी मात्र कोणत्याही प्रकारची ग्रामसभांची मान्यता घेण्यात आलेली नसल्याने आदिवासींच्या हक्कासाठी असणाऱ्या पेसा कायद्याची शासनाकडूनच पायमल्ली केली जात असल्याचे सरपंच मनोज नांगरे यांनी सांगितले.

काय आहे प्रकल्प ?

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून घाटघर व अंजनावळे (लव्हाळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीत माळशेजघाट भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्प (PSP) च्या विकासासाठी टोपोग्राफी आणि जिओ फिजिकल इन्व्हेस्टिगेशनची कामे करण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार असल्याचे समजते.

ग्रामस्थांचा विरोध का ?

या प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने या प्रकल्पास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार असून विस्थापित होण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. यासोबतच सह्याद्रीच्या रांगांमधील निसर्गातील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच नाणेघाट परिसरातील पर्यटनालाही फटका बसू शकतो अशी भीती स्थानिक आणि व्यावसायिकांमध्ये आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा या प्रकल्पास असणारा विरोध कायम आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय