Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आयुक्त साहेब, चिखली प्राधिकरण मध्ये मी उपोषण आंदोलन करणार

PCMC : आयुक्त साहेब, चिखली प्राधिकरण मध्ये मी उपोषण आंदोलन करणार

प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्रमिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते क्रांतीकुमार कडुलकर यांचा इशारा (PCMC)

पिंपरी चिंचवड : आयुक्त साहेब, तुमच्या पाणी पुरवठयाचे तीन तेरा नऊ बारा झाले आहेत, पेठ क्र १६ चिखली प्राधिकरण येथे आम्ही दुर्दैवी लोक घरे घेऊन वैतागलो आहोत, येथील पाणी पुरवठा व्यवस्थापन नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवस आड सुरू आहे, शहराला ६०० एम एल डी पाणी राज्यसरकार देते, त्या पाण्याचे नियोजन टॅक्स भरणाऱ्या सर्व नागरिकांना पुरेसे आणि पूर्ण दाबाने देण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे, मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ नुसार पाणी पुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य सेवा,सार्वजनिक वाहतूक या मुख्य सेवेसाठी मनपा आयुक्त यांची कायदेशीर जबाबदारी आहे. pcmc news

पेठ क्रं १६ चिखली प्राधिकरण येथे माझ्या सोसायटी मध्ये पाण्याची टाकी भरायला पाच तास लागतात, आम्ही रात्री ९.३० वा पाणी लिफ्ट करतो, हीच परिस्थिती संपूर्ण पेठ क्र १६ मध्ये आहे, याचा अर्थ पाणी पुरवठा अधिकारी अकार्यक्षम आहेत किंवा जनतेला त्रस्त करत आहेत.

मी क्रांतीकुमार कडुलकर एक निवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे, आचारसंहिता असली तरी एक दिवस पेठ क्र १६ मधील पाण्याच्या प्रेशरचे व्हिडिओ काढून बघावेत, आपल्या पाणी पुरवठा विभागाच्या टीमने एक दिवस संपूर्ण सेक्टर मध्ये संवाद साधून पाणी समस्या समजून घ्यावी.

गरज पडल्यास मी पाणी कुठे मुरतंय याचा शोध पत्रकारिता रिपोर्ट तयार करून देईन.
आपण पेठ क्रं १६ चिखली प्राधिकरण येथील पाणी समस्या सोडवली नाही तर आचार संहितेच्या काळात पेठ क्र १६ मध्ये जाहीर उपोषण आंदोलन करीन, माझ्या लढाऊ विचारांचे लाल बावटे माझ्याकडे अजून मी जपून ठेवले आहेत, याची जाणीव मी जाहीरपणे करून देत आहे.

तुमच्या ई मेल, स्मार्ट सारथी या डिजिटल सेवा तकलादू आहेत, मार्च २०२२ पासून मनपा मध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आम्हाला आमच्या तक्रारी देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नाही, नोकरशाही वर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे सर्व मुलभूत नागरी सेवा व्यवस्थापन कोसळलेले आहे.

त्यामुळे एक जागरूक नागरिक म्हणून पाण्याच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी उपोषण आंदोलन करणार आहे, याची पूर्व सूचना मी आपणास माध्यमाद्वारे देत आहे. pcmc news

Official press note – Krantikumar kadulkar

8888552300

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय