Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : लोकहो २० मे पुर्वी सर्व नाल्यांची साफसफाईचे काम पुर्ण होईल...

PCMC : लोकहो २० मे पुर्वी सर्व नाल्यांची साफसफाईचे काम पुर्ण होईल : मनपा

आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या सूचना PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : PCMC शहरातील विविध भागांमधील नालेसफाईचे काम २० मे पुर्वी पुर्ण करावे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नालेसफाईच्या कामामध्ये कोणताही अडथळा आल्यास याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. ज्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई करणे शक्य नाही किंवा अरुंद नाल्यांच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरूनच नालेसफाई करावी. तसेच सफाई पुर्वीची आणि सफाई नंतरची छायाचित्रे काढवीत आणि साफसफाईचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा.

बुजविलेले नाले, नाल्यावरती किंवा नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण आणि नाल्याची रुंदी कमी केलेली आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या. pcmc news

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाळ्यास सुरूवात होते. पावसाळा सुरू झाल्यास नालेसफाईचे काम करण्यास अडचणी येतात, त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधी सर्व नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे.

आठही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत लहान-मोठे सुमारे १४८ नाले साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या नालेसफाईच्या (Drain cleaning) कामाचा आढावा घेण्यासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे Pradeep Jambhale Patil) पाटील बोलत होते.

या बैठकीस उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, सतीश वाघमारे, विजय वाईकर, गणेश देशपांडे, अनिल शिंदे, देवन्ना गट्टूवार, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, मगेश आढाव, अंकुश झिटे, दरवडे के.डी, राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक सतिश पाटील, तानाजी दाते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.pcmc news

ज्या नाल्यांमध्ये साफसफाई करताना अडचणी येत आहेत त्या नाल्यांची संबंधितांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढावा. दररोज होणाऱ्या नाले सफसफाईच्या कामाचे अपडेट्स आरोग्य विभागाला द्यावेत. सखल भागातील नाल्यांची योग्यरित्या साफसफाई करून तेथील मोठी गटारे, छोटे नाले यातील पुर्ण गाळ काढावा जेणेकरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या. pcmc news

तसेच यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नाल्यांची लांबी, नाल्यांचे ठिकाण (कोठून कोठपर्यंत), नाल्यांची रूंदी, कामकाज सुरू केलेला दिनांक, कामाची टक्केवारी, नाले साफसफाई कामाची प्रगती इ. बाबींची सविस्तर माहिती घेतली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय