पुणे : जुन्नर, आंबेगाव व खेडच्या विकासाचे नवे द्वार खुले होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विशेष म्हणजे भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहे.
बनकर फाटा ते तळेघर आणि भीमाशंकर ते राजगुरूनगर या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साहेबांना विनंती पत्र लिहिले होते. यासंदर्भात सरकारी प्रक्रियेनुसार सामाजिक, आर्थिक, पर्यटन विकास व इतर अनेक विविध बाबींचा विचार करून या रस्त्यांचा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम प्रकल्पात समावेश केला जाईल, असा सकारात्मक प्रतिसाद त्यावेळी गडकरी यांनी दिला होता, अशी माहिती खा. कोल्हे यांनी दिली आहे.
डॉ. कोल्हे म्हणाले, हे सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की, खेड-चास-वाडा-तळेघर – श्री क्षेत्र भीमाशंकर आणि बनकर फाटा- जुन्नर- घोडेगाव- तळेघर- श्री क्षेत्र भीमाशंकर या दोन रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांना राष्ट्रीय महामार्गाने जोडले जाणार आहे. शिरूर मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने नितिनजी गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याकरिता, या रस्त्यांवरून पर्यटकांचा तसेच या परिसरात राहणाऱ्या आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी हा नवीन राष्ट्रीय महामार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याच्या माझ्या मागणीवर ज्याप्रमाणे गडकरी साहेबांनी तातडीने निर्णय घेतला, त्याप्रमाणेच लवकरात लवकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचाही ते सकारात्मक विचार करतील, असा मला विश्वास आहे. शिरूर मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कामासाठी माझा पाठपुरावा याप्रमाणेच अविरतपणे सुरू राहील.
हेही वाचा
ब्रेकिंग : शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतरावर झाला ‘हा’ निर्णय
जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके
पराभव समोर दिसत असल्यानेच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या – किसान सभा
जुन्नर : भास्कर पानसरे सरांच्या आठवणींना उजाळा, शिष्यवृत्ती वाटप व शाळेसाठी RO वॉटर फिल्टर प्रदान
ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी
MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख