Wednesday, May 8, 2024
Homeराज्यएमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी बँक कर्जाला शासनाची हमी

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी बँक कर्जाला शासनाची हमी

मुंबई : एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12 हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात 1 लाख 74 हजार 940 कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम 21 नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार 60 हजार कोटीपर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.

हेही वाचा :

राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे रिक्त जागांसाठी भरती, प्रकृतीने सुदृढ आहात तर लगेच अर्ज करा !

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे 58 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय