Thursday, May 9, 2024
Homeग्रामीणजुन्नर : भास्कर पानसरे सरांच्या आठवणींना उजाळा, शिष्यवृत्ती वाटप व शाळेसाठी RO...

जुन्नर : भास्कर पानसरे सरांच्या आठवणींना उजाळा, शिष्यवृत्ती वाटप व शाळेसाठी RO वॉटर फिल्टर प्रदान

जुन्नर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबे येथे कै. भास्करराव पानसरे यांच्या जन्मदिनानिमित्त “आठवणीतील भास्कर सर” तसेच भास्करराव पानसरे शिष्यवृत्ती वाटप व शाळेसाठी RO वॉटर फिल्टर प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.

भास्कर सरांच्या आठवणींना उजाळा मिळावा या हेतुने माजी विद्यार्थी संघ तांबे, CH 86 बॅच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “आठवणीतील भास्कर सर” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भास्कर पानसरे च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. “आठवणीतील भास्कर सर” या कार्यक्रमात विद्यालयाच्या माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व CH 86 मधील सहकारी यांनी सरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी सरांच्या आठवणीमुळे वातावरण काहीसे भावुक झाले होते. सरांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कौटुंबिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वांनी भरभरून कौतुक केले व त्यांच्या अचानक जाण्याने समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.

तषेच इयत्ता ८, ९, १० वी च्या विद्यार्थ्यांना भास्करराव पानसरे शिष्यवृत्ती चे वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन भास्कर पानसरे सरांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी विद्यार्थी संघ तांबे व CH 86 यांच्यावतीने शाळेला १०० लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर भेट देण्यात आला. जुन्नर तालुक्यात ९९.४० टक्के गुण मिळवून इयत्ता दहावी प्रथम क्रमांक पटकावलेल्या श्रावणी डुंबरे या विद्यार्थिनीचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही कार्यक्रमाला तांबे, बेलसर, येणेरे, खामुंडी येथील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमला ऑनलाईन उपस्थित राहिले. भास्कर सरांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती देण्यासाठी पानसरे कुटुंबियांकडून २५ हजार रुपयाची रक्कम कायम ठेवीसाठी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सरांचे धाकटे बंधू एकनाथ पानसरे यांनी उपस्थित माजी विद्यार्थी मित्रपरिवार व नातेवाईक यांचे आभार मानले.

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

आजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या शहरातील दर !

राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय