Friday, May 17, 2024
Homeआंबेगावफलोदे येथे शहीद राजगुरू यांची जयंती साजरी !

फलोदे येथे शहीद राजगुरू यांची जयंती साजरी !

घोडेगाव : शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय फलोदे येथे शहीद राजगुरू यांची जयंती साजरी करण्यात आली. मुकुल माधव फाऊंडेशनचे बबलू मोकळे यांनी राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शैलेश सर, स्वप्नील व्यवहारे, आदिम संस्थेचे राजु घोडे तसेच तळेघर केंद्रातील अशा वर्कर उपस्थित होते. (Martyr Rajguru’s birth anniversary celebration at Phalode)

यावेळी राजू घोडे बोलताना म्हणाले, राजगुरू हे लहानपणापासून कुशाग्र बुध्दीचे होते. त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. संस्कृत शिकण्यासाठी ते वाराणसी येथे गेले. यातच त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्याशी भेट झाली. हिंदूस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये ते सामिल झाले. यामध्ये त्यांची जतींद्र दास, भगतसिंग, सुखदेव यांच्याशी भेट झाली. आपल्या देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवून स्वातंत्र्य मिळावे. यासाठी हे क्रांतिकारी सतत लढत राहिले. 

पंजाब येथे क्रांतिकारी आंदोलन सुरू असताना ब्रिटिशांच्या लाठी‌ हल्ल्यामध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी इंग्रज अधिकारी सॉडर्स यांची हत्या करण्याच्या कटामध्ये राजगुरू सहभागी होते. सेंट्रल जेल मध्ये बॉम्बस्फोट करण्यात सहभागी होते. लाहोर कटामध्ये राजगुरू सहभागी होते.या कारणांमुळे राजगुरू यांना इंग्रजांनी अटक केले. व त्यांना ३१ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. त्यांच्यासोबत भगतसिंग व सुखदेव यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे २३ मार्च १९३१ हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जीवनातून देशभक्तीचा मौल्यवान गुण आपण सर्वांनी अंगीकारला पाहिजे, असेही राजु घोडे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जोशी यांनी केले व उपस्थितांचे आभार संगिता वडेकर यांनी मानले. स्थानिक संयोजन रेखा शेळके व संदिप शेळके यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज   

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती  

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज ! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती

Martyr Rajguru's birth anniversary celebration at Phalode
Martyr Rajguru's birth anniversary celebration at Phalode
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय